आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वर्गमित्राची अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून संबंधित मुलीच्या वर्गमित्राची हत्या केली. ही घटना निगडी परिसरातील पूर्णानगर भागात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वेदांत जयवंत भाेसले (१५, पूर्णानगर) असे मृत मुलाचे नाव अाहे.   

 

तर  पोलिसांनी राेहन प्रदीप महाळगीकर (१८, निगडी) या अाराेपीस अटक केली अाहे.
राेहन हा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत अाहे.  अाराेपीविराेधात वेदांतची अाई जान्हवी भाेसले यांनी फिर्याद दिली. वेदांत हा निगडीतील अमृता माता शाळेत दहाव्या वर्गात होता. परीक्षा असल्याने ताे त्याच्या अाेळखीच्या एका वर्गमैत्रिणीसाेबत मागील काही दिवसांपासून स्वत:च्या घरी अभ्यास करत हाेता.

 

साेमवारी रात्री अभ्यास केल्यानंतर उशीर झाल्याने ताे मैत्रिणीला तिच्या घरी साेडण्याकरिता दुसऱ्या दुचाकीवरून साेबत गेला हाेता. तिला सोडून घरी परतत असताना दबा धरून बसलेल्या राेहनने वेदांतच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करून पूर्णानगरमधील माेरया क्लासिक बिल्डिंगच्या पायरीवर त्याला टाकून दिले  आणि पसार झाला. दरम्यान, वेदांत घरी न परतल्याने त्याच्या आईने वर्गमैत्रिणीच्या घराकडे जाऊन शोध घेतला. त्या वेळी त्यांना वेदांत हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच निगडी पाेलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या वेदांतला वायसीएम रुग्णालयात उपचाराकरिता हलवले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले.    

 

संशयातून घेतला बळी
पाेलिसांच्या माहितीनुसार, मृत वेदांत हा त्याच्या वर्गमैत्रिणीचा रोहन हा मित्र अाहे. रोहनचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. वेदांत आणि संबंधित मुलगी अभ्यासासाठी एकत्र येत असल्याने रोहनच्या मनात वेगळाच संशय निर्माण झाला. याच संशयावरून त्याने वेदांतवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

 

बातम्या आणखी आहेत...