आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन गंडा: फेसबुकवर मैत्री करून 62 वर्षीय महिलेची 22 लाखांची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हडपसर परिसरात राहणाऱ्या एका 62 वर्षीय महिलेची फेसबुकच्या माध्यमातून बेरी ग्रिफिन नावाच्या इसमाशी काही दिवसांपूर्वी अाेळख झाली. त्यानंतर सदर इसमाने ज्येष्ठ नागरिक महिलेशी अाेळख वाढवून तिचा विश्वास संपादन करुन तिची 22 लाख 52 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. 

 

याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक महिलेने अाराेपी विराेधात हडपसर पाेलीस ठाण्यात तक्रार दिली अाहे. अाराेपीने फेसबुकवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हाेती. त्यानंतर सदर दाेघात अाेळख हाेऊन त्यांच्यात नियमितपणे चॅटिंगद्वारे संभाषण हाेऊ लागले. अाराेपी इसमाने महिलेचा विश्वास संपादन करुन तिला सामाजिक कामासाठी मी परदेशातून पुण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर एके दिवशी महिलेला अाराेपीचा फाेन येऊन त्याने ‘मी भारतात अालाे असून माझ्याजवळ परकीय चलन जास्त असल्यामुळे विमानतळावर मला कस्टम विभागाचे अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगितले. 

 

त्याठिकाणावरुन बाहेर पडण्यासाठी मला पैशांची गरज असून महिलेस बॅंक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने बॅंक खात्यावर 22 लाख 52 हजार रुपयांचा भरणा केला. त्यानंतर महिलेने अाराेपीशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा फाेन बंद करण्यात अाल्याचे स्पष्ट हाेऊन महिलेची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

बातम्या आणखी आहेत...