आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हडपसर येथील रोकेम कचरा प्रकल्पाला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 3 गाड्या दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हडपसर येथील रामटेकडी मधील रोकेम कचरा प्रकल्पाला आग लागली असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम चालू आहे. या कचरा प्रकल्पावरून येत्या काळात वाद अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

रोज 1600 टन कचरा निर्माण

पुणे शहरात दररोज 1600 टन कचरा निर्माण होत असून उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. याच मोठ्या कचरा डेपोचा भाग असणाऱ्या हडपसर येथील रामटेकडी मधील रोकेम कचरा प्रकल्पास आग लागण्याची घटना घडली आहे. औरंगाबाद येथील कचरा प्रकल्पावर 16 दिवसांपासून तोडगा निघाला नसून या गंभीर विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा डंपिंगसाठी जागा देणार नाही, अशी घोषणा करताच काही तासात हडपसर येथील रोकेम प्रकल्पास आग लागते कशी असा सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी उपस्थित केला. ही आगीची घटना लक्षात घेता केवळ हडपसर येथे नव्याने प्रकल्प आणण्यासाठी आग लावण्याचा प्रकार घडल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी पक्षावर त्यांनी टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...