आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात प्रिंटिंग प्रेसला अाग, अडकलेल्या दाेघांचा मृत्यू;कारागिरांना निघताच आले नाही बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शिवाजीनगर परिसरातील एका प्रिंटिंग प्रेसला बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण अाग लागल्याची घटना घडली. या वेळी प्रेसला बाहेरून कुलूप लावलेले होते. त्यामुळे बंद असलेल्या प्रेसच्या शटरमधून बाहेर पडता न अाल्याने दाेघांचा अागीत होरपळून दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. नरपतसिंग यशवंत सिंग राजपूत (२३, राजस्थान) व लक्ष्मणराम उमाराम सुतार (३३, निगडी, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या जवानांनी वर्तवला अाहे.     


शिवाजीनगर येथील हिमालया हाइट्स या इमारतीत सुनील भंडारी यांच्या मालकीची प्रिंटिंग प्रेस अाहे. ही प्रेस जुनी असल्याने त्यात माेठ्या प्रमाणात काम सुरू असते. सध्या प्रेसमध्ये मिठार्इचे बाॅक्स प्रिंटिंग करण्याचे काम सुरू असल्याने कच्चा केमिकल कागद मोठ्या प्रमाणात ठेवला हाेता. प्रेसच्या पाेटमाळ्यावर मागील दोन महिन्यांपासून फर्निचरचे काम सुरू आहे. हे काम करणारे कारागीर पाेटमाळ्यावरचे काम संपवून झाेपी जात हाेते. प्रेस ‘एल’ अाकारात असल्याने पुढील बाजूस सुरुवातीला लागलेली अाग हळूहळू मागे पसरत गेली. त्यामुळे पाेटमाळ्यावर झाेपलेल्या दाेन कारागिरांनी त्याची चाहूल खूप उशिरा लागली. मात्र, अागीच्या ज्वाळा माेठ्या प्रमाणात भडकू लागल्याने तसेच धुराचे लाेट प्रेसमध्ये सर्वत्र पसरू लागल्याने ते झाेपेतून जागे झाले अाणि त्यांनी प्रेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. प्रेसचे  शटर बाहेरील बाजूने कुलूप लावून बंद असल्याने तसेच खिडक्यांनाही लाेखंडी जाळ्या बसवल्या असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यांच्या अारडाअाेरड्याने शेजारील नागरिक जागे झाले अाणि त्यांनी याबाबतची माहिती अग्निशामक दलास दिली.  

 

कारागिरांना आतून निघताच आले नाही  
अग्निशामक दलाचे जवान तीन वाजता घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, त्यांना दुकानाचे शटर बंद असलेल्या व अातमधून माेठ्या प्रमाणात अागीच्या ज्वाळा खिडकीतून बाहेर पडत असल्याचे दिसले. तसेच प्रेसच्या इतर चार दुकानांतूनही धुराचे लाेट बाहेर पडत असल्याचे दिसले. त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दुकानाचे शटर अाणि लाेखंडी खिडक्या काढल्या. त्यानंतर मोठ्या शर्थीने आग  विझवली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...