आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमधील गोळीबार CCTV त कैद, एक जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये दोन गटात किरकोळ झालेल्या वादातून एकावर गोळीबार करण्यात आला आहे. हा प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे सोमवारी (दि. 19) रात्री घडला. जयवंत चितळकर यांच्यावर गोळीबार झाला असून त्यांच्या हाताच्या दंडात गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत झाला आहे. 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर गाडी पुढे-मागे घेण्याच्या वादातून हा गोळीबार झाला. यामध्ये जयवंत चितळकर हे जखमी झाले आहेत. जयवंत चितळकर त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्याने त्याची दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जात असलेल्या एका कारला त्या दुचाकीमुळे अडचण येत होती. कार चालकाने दुचाकी काढण्यास सांगितले. त्यावरून त्या दोघात किरकोळ भांडणे झाली. कारचालकाने त्याच्या अन्य साथीदारांना आणून चितळकर सोबत भांडण केले. यामध्ये चितळकर याच्यावर गोळीबार झाला, यामध्ये त्याला दोन गोळ्या लागल्या. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  तपास चिंचवड पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...