आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजर विठ्ठलाचा : बेलवाडीतील तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील रिंगणाने घालवला वारकऱ्यांचा शीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - येथील बेलवाडीत रंगलेल्या तुकोबारायांच्या रिंगण सोहळ्यामुळे हजारो वारकऱ्यांना पायी चालून आलेला शीण कमी झाला. हजारो वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये रंगलेल्या या रिंगण सोहळ्यात हजारो वारकऱ्यांनी अश्वाच्या टाचेखालची माती कपाळाला लावत नव्या दमाने वारीतील पुढील प्रवास सुरू केला. 


इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा होत असतो. रविवारी अत्यंत उत्साहात हे रिंगण पूर्ण झाले. सणसरहून बेलवाडीत अत्यंत उत्साहाने तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणेच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा रिंगण सोहळा रंगला. 

बातम्या आणखी आहेत...