आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी नाट्य परिषदेत प्रथमच तरुण रंगकर्मींचे वर्चस्व;60 पैकी 40 जागा तरुण वर्गाने जिंकल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वर्षानुवर्षे मातब्बर संस्थांचे पदाधिकारी म्हणून जागा अडवणारे अनेक जण असतात. निवडून येण्याचे कसब त्यांनी पुरते मिळवलेले असते. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत मात्र मतदारांनी अनेक ढुढ्ढाचार्यांना  घरी पाठवून, युवा रंगकर्मींना निवडून दिले आहे. नजीकच्या भविष्यात  सांस्कृतिक विश्वातील नाट्य परिषदेसारखी महत्त्वाची संस्था तरुणाईच्या हाती वेगळेपण सिद्ध करेल, अशी चर्चा नाट्यवर्तुळात आहे.

    
नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच झाली. राज्यभरातून या निवडणुकीसाठी दोन पॅनल्स तसेच अन्य उमेदवारही उत्सुक होते. काही रंगकर्मींच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे  ६० जागांपैकी तब्बल २५ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्याची गरजच पाडली नाही कारण २५ जागा बिनविरोध निवडून आल्या. उर्वरित ३५ जागांसाठी राज्यभरातून ७७ उमेदवार इच्छुक होते. त्यामध्ये  विद्यमान  पदाधिकारी असणारे मोहन जोशी, लता नार्वेकर आणि दीपक करंजीकर हे मातब्बर विविध कारणांनी प्रक्रियेतून बाद झाले. मोहन जोशी यांचा अर्ज सुरुवातीच्या छाननी प्रक्रियेतच बाद झाला, नार्वेकर यांनी अर्ज दाखलच केला नाही, तर करंजीकर यांचा पराभव झाला.   


निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ दळवी म्हणाले,‘निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार पार पडली. राज्यभरातून ९ जिल्ह्यांतून २७ केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली गेली. ६० पैकी २५ जागा  बिनविरोध निवडून आल्याने  ३५ जागांसाठी निवडणूक झाली.  


राज्यातील   जिल्हानिहाय सदस्यसंख्या अशी 
मुंबई -११, मुंबई उपनगर -५, ठाणे-४,रत्नागिरी -२,कोल्हापूर -२,सांगली -३,सोलापूर -६ , पुणे-७, नाशिक-३ ,नगर -२,जळगाव -२, लातूर -१,उस्मानाबाद -१,नांदेड -१,अकोला -२,वाशीम -२,नागपूर -३,बीड -२,बेळगाव -१

 

एप्रिल महिन्यात बैठक  
निवडून आलेल्या उमेदवारांची आणि जुन्या कार्यकारिणीची एकत्र बैठक एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला होईल आणि मग नवी कार्यकारिणी काम सुरू करेल. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये तरुणाईची संख्या अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. तरुण रक्ताला संधी मिळते आहे, ही चांगली गोष्ट आहे, त्याचे स्वागत केले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...