आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांची प्रकृती चिंताजनक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वैयक्तिक आणि सामाजिक-राजकीय कारकीर्दीत आयुष्यभर लोकशाही आणि समाजवादी मूल्यांची जोपासना करणारे करणारे स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांची प्रकृती  चिंताजनक आहे. त्यांना पुना हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

 

 

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडले...

शालेय जीवनातच 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी भाग घेतला. गोवामुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही ते सक्रिय होते. या काळात त्यांनी जबरदस्त मारहाण आणि तुरूंगवास भोगला. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी 19  महिने तुरूंगवास सोसला. मूळ पिंड चळवळ आणि संघर्षाचा असल्याने त्यांना तब्बल 15  वेळा कारावासाचा ‘मान’ मिळाला! अगदी अलीकडे शिक्षणहक्कासाठी सत्याग्रह करून 88 व्या वर्षी त्यांनी अटक करवून घेतली. मूल्याधारित राजकारण त्यांनी प्रिय मानले. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली भारतयात्रेत त्यांनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा पूर्ण केली. जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, समाजवादी जन परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविली आणि त्या पदांची उंची वाढविली. पुण्याचे महापौर आणि राज्याचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात एका गुन्हेगाराचे साथीदार लाच म्हणून मोठी रक्कम घेऊन आले, तेव्हा वैद्य यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे पहिले विधेयक मांडणे, गृहमंत्री या नात्याने पोलिसांना फूल पँट देणे आणि सेवानिवृत्तांच्या निवृत्तिवेतनाची महागाईशी जोडणी करण्याचे अनेक निर्णय त्यांनी घेतले.