आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटकॉर्इनद्वारे आणखी 10 जणांची 60 लाखांची फसवणूक, भारद्वाज बंधूकडे कसून तपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बीटकॉर्इनच्या माध्यमातून हजारो गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सायबर क्रार्इम सेलने मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज आणि विवेककुमार भारद्वाज यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनाविल्यानंतर पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेत त्यांचेकडे कसून चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, शुक्रवारी डॉक्टर, व्यापारी अशा आणखी 10 जणांनी सुमारे 60 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. 

 

बीटकाॅर्इन घाेटाळयात सात प्रमुख अाराेपी असून भारद्वाज बंधूचे वडील महेंद्रसिंग भारद्वाज हे मुख्य अाराेपी अाहेत. सध्या महेंद्रसिंग भारद्वाज सिंगापूर येथे तर अजित भारद्वाज हा त्यांचा मुलगा दुबर्इ मध्ये असल्याची माहिती तपासा दरम्यान समाेर अाली अाहे. सदर गुन्हयातील अाराेपींना जेरबंद करण्यासाठी पुणे पाेलिसांचे एक पथक दिल्ली येथे तळ ठाेकून असून लवकरच याप्रकरणी बडे मासे गळला लागण्याची शक्यता पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांनी वर्तवली अाहे. 


फसवणूक केलेल्या पैशांतून अाराेपींनी परदेशात काही मालमत्ता विकत घेतल्या अाहेत का यादृष्टीने ही पाेलिस तपास करीत अाहे. अमित भारद्वाज याने नांदेड येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून बेंगळूर मधील नामांकित इन्फाेसिस कंपनीत सन 2014 पर्यंत त्याने नाेकरी केल्याचे स्पष्ट झाले अाहे. तर विवेककुमार भारद्वाज हा बीडीएस डाॅक्टर असून पुण्यासह विविध शहरातील डाॅक्टरांना त्याने गेनबीटकाॅर्इन मध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत अाकर्षक परतावा मिळेल असे सांगत फसवणूक केल्याचे उघडकीस अाले अाहे. 

 

गुंतवणुकदारांकडून बीटकाॅर्इन घेतल्यानंतर सदर बीटकाॅर्इनचे चीन मध्ये माइनिंग करुन क्रिप्टाेकरन्सी चलनाची किंमत वाढवून माेठा माेबदला दिला जार्इल असे अमिष अाराेपींनी दाखविल्याच्या तक्रारी पाेलीसांना प्राप्त झाल्या अाहेत. बीटकाॅर्इन घाेटाळयाचा गुन्हा उघडकीस अाल्यानंतर सायबर क्रार्इम सेलकडे माेठे उद्याेजक, व्यापारी यांची तक्रारी देण्यासाठी रीघ लागली असून पाेलिसांकडून अातापर्यंत 37 जणांचे जबाब घेत तक्रारी नोंदविण्यात अाल्या अाहे.

बातम्या आणखी आहेत...