आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात खराडी येथे भटक्या कुत्र्याचा दीड वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला, डोळाच बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खराडी येथे एका भटक्या कुत्र्याने दीड वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. 

 

 

खराडी येथे राहणाऱ्या अण्णा गाडेकर यांची ही चिमुरडी आहे. ती अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की चिमुकलीच्या डोळ्याचा काही भाग बाहेर आला होता. या चिमुकलीवर येरवडा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

 

डोळ्यावर करावी लागली शस्त्रक्रिया
या चिमुकल्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या चेहऱ्यावरही गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर येरवडा परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत महापालिका कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. आत्तापर्यंत या मुलीच्या उपचारावर जवळपास 60 हजार रुपये खर्च झाल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...