आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे- उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू, पाचव्या मजल्यावरुन मारली होती उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- वाघोलीतील रायसोनी काॅलेजमध्ये शिकणा-या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन शनिवारी सकाळी 11 वाजता उडी मारली होती तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत ती गंभीररित्या जखमी झाली होती तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

 

 रायसोनी काॅलेजमध्ये बीई इलेक्ट्राॅनिक्सच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या रश्मी प्रभू करनेवाड (वय 22, मूळ नाशिक रहिवासी) हिने शनिवारी सकाळी अकरा वाजता इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला लगेच जवळच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण प्रकृती बिघडल्याने तिला रुबी हाॅस्पिटलला हलवावे लागले. तिच्यावर उपचार सुरु होते रात्री प्रकृती अधिकच चिंताजनक झाली होती. डाॅक्टरांनी रात्री 8 वाजता तिला मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...