आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकालात उत्तीर्ण मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा 7 टक्के अधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा हा निकाल ८८.४१% लागला असून उत्तीर्ण मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा ७.१३ टक्क्यांनी अधिक आहे. मंडळाच्या ९ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक ९४.८५% असून सर्वात कमी म्हणजे ८६.१३% निकाल नाशिक मंडळाचा आहे. औरंगाबाद मंडळाचा निकाल ८८.७४% आहे.


बीड : विद्यार्थ्यांना सरासरी गुण
बीडमधील उत्तरपत्रिका जळीत प्रकरणाविषयी मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे म्हणाल्या, उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण दिले जातील. अन्य विषयांमध्ये जेवढे गुण मिळाले असतील त्याची सरासरी काढून ज्या विषयाची उत्तरपत्रिका जळाली आहे त्या विषयात गुण दिले जातील. 

 

दिव्यांगांचा निकाल ९१.७८ %
विविध प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.७८♥% लागला आहे. यात दृष्टिहीन, अल्पदृष्टी, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी, सिकलसेल, थॅलेसेमिया, मूकबधिर, स्वमग्न, बहुविकलांग अशा विद्यार्थ्यांना २० गुणांची सवलत दिली जाते. यंदा एकूण ५,३७४ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४,९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९१.७८ टक्के इतके आहे.

 

विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९५.८५ टक्के निकाल

-  सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांसाठी बारकोड पद्धतीचा अवलंब झाला. 
-  प्रथमच सर्व सूचना इंग्रजी आणि  मराठी भाषेतून देण्यात आल्या.
-  राज्यामधून ६६६२९ पुनर्परीक्षार्थी.
-  अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.७८%.
-  एकूण २१० विषयांची परीक्षा झाली. 
-  ५६ विषयांचा निकाल १०० टक्के. 
-  खासगीरीत्या प्रविष्ट विद्यार्थी ४९५१५.
-  खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तेजन गुण.
- विज्ञान शाखेतील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण सर्वाधिक ९५.८५ टक्के आहे.

 

या वर्षी सुमारे ३१९९ विद्यार्थ्यांना क्रीडानैपुण्याचा मिळाला लाभ
राज्यात खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी अतिरिक्त गुण दिले जातात. या वर्षी राज्यातील ३१९९ विद्यार्थ्यांना या क्रीडानैपुण्य गुणांचा लाभ मिळाला. दहावी- बारावीच्या निकालाच्या तारखांविषयी सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्याबाबत मंडळाकडून सायबर सेलकडे तक्रार केली आहे.

 

मंडळनिहाय निकाल
औरंगाबाद ८८.७४ %  
नाशिक ८६.१३ %
लातूर ८८ .३१ %
नागपूर ८७.५७ %
पुणे ८९.५८ %
मुंबई ८७.४४ %
कोल्हापूर ९१ %
कोकण ९४.८५ %
अमरावती ८८ . ०८ %
 
शाखानिहाय निकाल असा
- ९५.८५% विज्ञान
- ८९.५०% वाणिज्य
-  ७८.९३% कला
- ८२.१८% एमसीव्हीसी
बातम्या आणखी आहेत...