आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विद्यापीठात आयसीसीआरचे विभागीय केंद्र अाजपासून; सांस्कृतिक बंध दृढ हाेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विद्यापीठाच्या प्रांगणात देशी-विदेशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वावर वाढावा, विद्यार्थ्यांमधील कलागुणांसह अन्य सकारात्मक घटकांची परस्पर देवाणघेवाण सोपी व्हावी या हेतूने केंद्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचे (आयसीसीआर)  विभागीय केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात येणार आहे. 


या केंद्राचे उद््घाटन सोमवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुणे विद्यापीठाला स्वायत्त दर्जा मिळाला आहे, देशातील पहिल्या दहा दर्जेदार विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचा समावेश आहे, विद्यापीठात शेकडो आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांच्या देशाचे ते येथील सांस्कृतिक राजदूतच आहेत, हे लक्षात घेऊन आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. सहस्रबुद्धे यांनी केंद्राचे कार्यालय विद्यापीठ प्रांगणात असावे हे सुचवले. 

 

आयसीसीआरचे कार्य काय   
- विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध देशांशी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मैत्र निर्माण करणे   
- परदेशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देणे   
- परस्पर सहकार्याने शैक्षणिक - सांस्कृतिक क्षेत्रातील विषयांवर चर्चा, व्याख्याने, परिसंवाद घडवणे   
- अन्य देशांच्या विद्यापीठांत भारतीय विद्यासंदर्भातील अध्यासने स्थापन करण्यात पुढाकार घेणे   
- अन्य देशांतील विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, कला, साहित्यविषयक उपक्रमांत सहभागी करून घेणे. 

बातम्या आणखी आहेत...