आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • SSC RESULT : 125 विद्यार्थ्यांना 100% गुण, पैकी 93 टॉपर मराठवाड्याचे

SSC RESULT : 125 विद्यार्थ्यांना 100% गुण, पैकी 93 टॉपर मराठवाड्याचे; लातूरच्या 70 विद्यार्थ्यांना अाऊट ऑफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. बारावीप्रमाणे इयत्ता दहावीतही मुलींनीच बाजी मारली. राज्याचा निकाल ८९.४१% इतका लागला. गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल ०.६७% अधिक आहे. 


कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६% असून नागपूर विभागाचा सर्वात कमी ८५.९७% आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.७० टक्के अधिक आहे.  राज्यभरातून या परीक्षेसाठी १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ लाख ५६,२०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

फेरपरीक्षा १७ जुलैपासून

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी फेरपरीक्षा (पुरवणी परीक्षा) १७ जुलैपासून होणार आहे. श्रेणीसुधार, गुणसुधार (क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षेस बसण्याची संधी मिळेल. पुरवणी परीक्षा आणि मार्च २०१९ मधील परीक्षा, अशा दोन परीक्षांद्वारा योजनेचा लाभ घेता येईल.

 

यामुळे वाढला गुणांचा टक्का
अतिरिक्त कला, क्रीडा नैपुण्य गुणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढली आहे. बेस्ट ऑफ फाइव्हमुळे हे प्रमाण वाढले आहे. या शिवाय, सामाजिकशास्त्र, गणित, भाषा विषयातही पैकीच्या पैकी गुण मिळत आहेत.

 

९२% मुली, ८७ मुले उत्तीर्ण
दहावीत विद्यार्थिनींचा निकाल ९१.९७ टक्के, तर विद्यार्थ्यांची टक्केवारी ८७.२७ इतकी आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ४.७०% अधिक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के लागला.

 

00% निकालाच्या शाळा

राज्यात एकूण 33 

एकूण मराठवाडा 15 
अाैरंगाबाद विभाग 09
 
100% निकालाच्या शाळा
राज्यात एकूण 4028 
एकूण मराठवाडा 512 
अाैरंगाबाद विभाग 335
 
> निकालाची वैशिष्ट्ये अशी
- एक लाख १४ हजार ४१  पुनर्परीक्षार्थी. पैकी ४९,२३२ विद्यार्थी (४३.५४%) उत्तीर्ण.

- एकूण ५७ विषयांची परीक्षा. त्यातील ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला.

- राज्यात एकूण २१,९५७ शाळांतून विद्यार्थी परीक्षेस बसले. ४२,६४८ खासगी विद्यार्थी. त्यांचा निकाल ५१.८६% लागला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... विभाग निहाय निकाल 
बातम्या आणखी आहेत...