आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त नायब तहसिलदारांच्या थोरल्या मुलाने केली जन्मदात्या आईसह भावाची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रॉपर्टीच्या वादातून सेवानिवृत्त नायब तहसिलदारांच्या थोरल्या मुलाने जन्मदात्री आई आणि धाकट्या भावाची धारदार वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड)  येथे आज (सोमवार) सकाळी ही घटना घडली आहे.

 

राजेश गजानन घोडेके (वय-40) आणि जयश्री गजानन घोडके (वय-63) असे मृत मायलेकांची नावे आहेत.  तर राकेश गजानन घोडके (वय- 43) असे अेरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

सूत्रांनुसार, मलकापूर येथील आझाद कॉलनीत घोडके कुटूंब राहात होते. आरोपी राकेश घर विकण्याचा तगादा लावला होता. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भाऊ राजेश व आई जयश्री यांचा राकेश याने गुप्तीने आठ ते दहा वार करून खून केला. यावेळी त्याने अंगणातील लोखंडी पाईप व बादलीनेही डोक्यात वार केला. खून केल्यानंतर संशयित राकेश अंगणातच बसून होता. यावेळी मलकापूरमध्ये राहणारे कराड शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सतीश जाधव आणि होमगार्ड शेडगे यांनी मोठ्या धाडसाने हातात गुप्ती व लोखंडी पाईप असताना त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...