आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपट्टीच्या दरवाढीविरोधात NCP, MNS आणि शिवसेनेचे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये आज राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेने एकत्र येत सत्ताधारी भाजपच्या पाणीदरवाढीच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. या आंदोलनामुळे आजची नियोजित सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यातच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीत दरवाढ केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

 

 

‘अरे चाटून खा भाजपा, पुसून खा भाजपा, चुरून खा भाजपा, खरडून खा भाजपा’ अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाणीदरवाढीला विरोध केला. आज सर्वसाधारण सभेच्या मुहूर्तावर महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारासमोर मनसेने पाणी पट्टी दरवाढ विरोधात निषेध आंदोलन सुरु केले. त्यानंतर शिवसेनाही याच जागी आंदोलन करणार होती मात्र शिवसेनेच्या आंदोलनाकांनी मनसेच्या आंदोलकांबरोबर घोषणाबाजी सुरु करत आंदोलनात सहभाग नोंदवला. मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आंदोलन करताना दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं राजकारणात पटत नसलं तरी, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हे दोन्ही पक्ष एकत्र दिसत आहेत. तर महापालिकेच्या आत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी (पाणी पिण्याचा) तांब्या वाजवून पाणी दरवाढ विरोधात आंदोलन केले. आंदोलनाबरोबरच आयुक्त श्रावण हार्डीकर यांना अडवण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे पोलीस, पालिकेचे सुरक्षा रक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीफार झटापट झाली.

 

 

पाणी दरवाढ विरोधात कोणत्याही गटनेत्याना सूचना दिल्या नव्हत्या, अचानक हुकूमशाही पद्धतीने पाणी दरवाढ करण्यात आली. याविषयी आम्ही आयुक्तांना कल्पना दिली होती. पाणी दरवाढीचा आम्ही निषेध करत आहोत. पाणी दरवाढ रद्द केली नाही तर पाणीपुरवठा कार्यालय राहणार नाही असा इशारा दिला. तर तिन्ही पक्ष्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...