Home | Maharashtra | Pune | light rain in maharashtra for next 4 days, cloudy weather all over state

राज्यात पुढील चार दिवस सर्वदूर पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

दिव्यमराठी वेब टीम | Update - Mar 15, 2018, 11:08 AM IST

पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.

 • light rain in maharashtra for next 4 days, cloudy weather all over state
  आजपासून पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.

  पुणे- अरबी समुद्रात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेषात चक्राकार वा-यांच्या स्थितीमुळे आजपासून पुढील चार दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

  अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाची शक्यता नाही मात्र, आजपासून पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्यात रविवारपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल तसेच राज्याच्या काही भागांत ढगाळ हवामान राहील असे हवामान खात्याने म्हटले आहे.

  बुधवारी सायंकाळी कोल्हापूर पट्ट्यात चांगलाच पाऊस पडला. तर आज सकाळपासूनच पुणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, सोलापूर पट्ट्यात ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी अद्याप सुर्याचे दर्शन झालेले नाही.

 • light rain in maharashtra for next 4 days, cloudy weather all over state

  पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागास आणि कोकणात अवकाळी पावसाने बुधवारी सायंकाळी झोडपून काढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कळे, बाजारभोगाव परिसराला आज सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे आंबा आणि काजू पिकांवर संकट कोसळले आहे.

   

   

  वातावरणात जाणवत होता उकाडा

   

  कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारपासून हवेत उकाडा जाणवत होता. वातावरण ढगाळ होते. सायंकाळी अचानक जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळत असल्याचे सांगण्यात येत होते.

Trending