आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- नागरिकांच्या अंगावर खाज येण्याची पावडर टाकून लूट करणारी एक टोळी पुणे पोलिसांनी पकडली आहे. वेगवेगळ्या ट्रिक वापरून ही टोळी नागरिकांना लूटत होती. या टोळीच्या 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अशी पकडली पुणे पोलिसांनी ही टोळी
- पुणे पोलिसांनी केशवनगर येथे एका बंगल्यात चोरी करण्यासाठी जात असलेल्या या आंतरराज्य टोळीला पकडले आहे.
- परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, या गँगकडून 4 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंढवा पोलिसांनी चिन्ना कुनचाल्ला आणि माधव गोगला गॅंगला पकडले आहे. हे सगळे आरोपी आंध्र प्रदेशातील आहेत.
- आरोपींकडून 7 दुचाकी, 14 मोबाईल फोन, चॉपर, चाकू, कटावणी, गलोर, लोखंडाचे गोळे, मिरची पावडर, खाज येणारी पावडर, बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. या सगळ्या गोष्टींचा वापर ते लुटीसाठी करायचे.
- मुंढवा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल गवळी यांना माहिती मिळाली होती की ही गँग केशवनगर येथे एका बंगल्यावर दरोडा टाकण्यास येणार आहे.
- पुण्यात या गॅंगने 12 ठिकाणी खाज येण्याची पावडर, घाण, वाहने पंक्चर करून, पैसे पडल्याच्या बहाण्याने लोकांना लुटले आहे. मागील दोन महिन्यापासून ही गँग पुन्हा सक्रीय होती. ठाणे आणि मुंबईतही या गॅंगने असेच काही गुन्हे केले आहेत.
- या गॅंगमध्ये 4 महिला असून ते बँकेच्या बाहेर आणि आत जाऊन पाहणी करुन ते लोकांना लुटत होते.
पुढील स्लाईडवर पाहा कशी लुटते ही गँग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.