आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश बापट यांचा मुलगा गौरव पुण्यात विवाहबध्द; दिग्गजांची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वरदा केळकर आणि गौरव बापट आज विवाहबध्द झाले आहेत. - Divya Marathi
स्वरदा केळकर आणि गौरव बापट आज विवाहबध्द झाले आहेत.

पुणे- पालकमंत्री गिरीश बापट यांचा मुलगा गौरव याचा विवाह समारंभ आज (दि. 21) एरंडवणे येथील डीपी रस्त्यावर असणाऱ्या शुभारंभ लॉन्स येथे पार पडला आहे. या विवाह सोहळय़ासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. विवाह सोहळय़ासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन डीपी रस्त्यावर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. पालकमंत्री बापट हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा बापट विजयी झाले आहेत. बापट यांचे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे विवाह सोहळय़ासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राज्यातील वेगवेगळय़ा भागातील आमदार आणि कार्यकर्ते या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

 

 

अशा जुळल्या रेशीमगाठी

स्वरदा या पुण्याच्या डीईएस लॉ कॉलेजध्ये त्या शिक्षणासाठी होत्या. त्यांंनी एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. याच कॉलेजमध्ये गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरवही शिक्षण घेत होते. कॉलेजला प्रवेश घेतल्यापासून दोघे एकमेकांना ओळखत होते. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर या दोघांनी घरच्यांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबे राजकीय पार्श्वभूमी असलेली आहेत, त्यांची एकाच पक्षाशी म्हणजेच भाजपशी बांधिलकी आहे. त्यामुळे घरच्यांनीही त्यांच्या या विवाहाला पाठिंबा दिलेला आहे.

 

 

कोण आहेत स्वरदा केळकर?

-स्वरदा केळकर या सांगली-मिरज कुपवाड महापालिकेच्या विद्यमान भाजप नगरसेविका आहेत.

-त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. तसेच राज्य सरकारने बाल हक्क आयोगावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

-भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या त्या कन्या आहेत. स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर सांगलीत व्यावसायिक आहेत.

 

 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...