आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- भोर तालुक्यातील चंदर या गावात नागपूर येथील रजनीकांत मेंढे हे शिक्षक आहेत. ते 29 वर्षाचे आहेत. ते रोज जीव धोक्यात घालून 50 किलोमीटरचा प्रवास पुर्ण करतात. ते केवळ एका मुलाला शिकविण्यासाठी शाळेत येतात.
400 फूटाची दरी ओलांडून येतात शाळेत
- रजनीकांत ज्या मुलाला शिकविण्यास येतात त्याचे नाव युवराज सांगळे आहे. तो मागील दोन वर्षांपासून या शाळेत येत आहे. रजनीकांत हे त्याचे शिक्षक आहेत. युवराजचे गाव डोंगरांनी वेढलेले आहे. येथे केवळ दुचाकीवरच येता येते. रजनीकांत रोज महामार्गापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत 400 फुटाची दरी पार करुन येतात.
गावात राहतात केवळ 60 लोक
- पुणे शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात 15 घरे आहेत. त्यात सुमारे 60 लोक राहतात. गो-पालन आणि मजुरी करून हे लोक आपली उपजीविका करतात. येथे आरोग्याच्या सुविधा देखील नाहीत. अनेकांनी उपजीविकेचे साधन नसल्याने मुंबईचा मार्ग धरला आहे. या गावात वीजही नाही. गावात सौर दिवे बसविण्यात आले होते पण ते आता खराब झाले आहेत.
विद्यार्थी शोधावे लागतात
- मेंढे यांना या गावातील शाळेसाठी विद्यार्थी शोधावे लागतात. ते म्हणतात, की युवराज हा माझा विद्यार्थी अनेकदा झाडामागे लपून बसतो. त्याला शोधून आणावे लागते. यात कधीकधी एक तासही जातो. असे का घडत असावे, याचा विचार केल्यावर लक्षात येते की, त्याला शाळेत मित्रच नसल्याने त्याला शाळेत यायला आवड नसावे.
- रजनीकांत म्हणतात, बाकी मुले आपल्या समवयस्क मुलांसोबत शिक्षण घेतात. तर युवराज एकटाच शिकत आहे. त्याच्यासाठी हे सारे खूपच रुक्ष आहे.
शाळेत आहे ई-लर्निंग सुविधा
- या शाळेत ई-लर्निंगची सुविधा आहे. त्यासाठी एक सोलर पॅनलही बसविण्यात आले आहे. रजनीकांत यांनी आपली बदली करुन घेण्याचे टाळले असून या शाळेत एक चांगला विद्यार्थी घडविण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.