आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवड: मिलिंद एकबोटेंच्या अटकेने भारिप-बहुजन महासंघाकडून फटाके फोडून जल्लोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी-चिंचवड- भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. यानंतर पिंपरीच्या आंबेडकर चौकात भारिप बहुजन महासंघ या पक्षाकडून आनंदोत्सव करण्यात आला. यावेळी पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच संभाजी भिडे यांना लवकरात लकवकर अटक करावी अशी मागणी देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली.

 

1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम सैनिकांवर दगडफेक करण्यात आली होती. या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर काळेवाडी येथील एका महिलेने पिंपरी पोलिस स्थानकात अट्रोसिटी, जाळपोळ, दंगल भडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा शिक्रापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. ज्या महिलेने फिर्याद दिली होती ती महिला भीमा कोरेगाव दंगल घडली त्या दिवशी हजर होती. त्यानुसार घडला प्रकार सांगत फिर्याद दाखल करण्यात आली होती. 

 

अडीच महिन्यानंतर एकबोटेंना अटक करण्यात आली याचा जल्लोष भारिप बहुजन महासंघाकडून करण्यात आला. आपल्याला माहित असेलच की, या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकबोटे व भिडे यांना अटकेची मागणी लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...