आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडमध्ये विनयभंग करुन तरुणीच्या शरीराचा चावा; युवती गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे बहिणीच्या शोधासाठी आईसोबत चाललेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिच्या शरिराचा चावा घेतला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

 

 

पंजनाथन कृष्णन (वय 50), मारिया पंजनाथन कृष्णन (वय 29, दोघेही रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिची आई तरुणीच्या बहिणीच्या शोधण्यासाठी काळेवाडी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी घरगुती भांडणाच्या कारणावरून आरोपीने महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या शरीराचा चावा घेत गंभीर जखमी केले. तपास सहायक निरीक्षक अभिजित जाधव  करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...