आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली. 

 


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत ही मागणी केली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...