आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- सांगवीमधील समर्थनगरमधील कैलास तौर या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. कैलास तौरची खून झाल्याचे उघड झाले असून कैलासकडे काम करणाऱ्या कामगारानेच त्याचा खून केला आहे. या कामगाराच्या पत्नीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न तौरचा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
नवी सांगवीत राहणाऱ्या कैलास तौर (वय 34) या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी त्याच्या राहत्या घरी आढळला होता. बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडला होता. या प्रकरणी पोलिसांनी नऊ तासांत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी कैलासकडे काम करणाऱ्या बिट्टू उर्फ जसवंतसिंह सतीश वर्मा या कामगाराला या प्रकरणात अटक केली आहे.
कैलासचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. तिथे बिट्टू उर्फ जसवंतसिंह सतीश वर्मा हा दोन महिन्यांपासून काम करायचा. कैलास तौरने दोन दिवसांपूर्वी पत्नीला कार्यक्रमानिमित्त मूळ गावी सोडले होते. घरी एकटा असल्याने त्याने बिट्टूच्या पत्नीला रात्री घरी येऊन स्वयंपाक बनवण्यास सांगितले. परंतु बिट्टूच्या पत्नीने जेवणाचा डबा करून पतीकडे देईन, असे उत्तर दिले. कैलासने बिट्टूला आणि त्याच्या पत्नीला छोट्या मुलीसह नवी सांगवी येथील घरी येण्यास सांगितले. रविवारी रात्री स्वयंपाक करून जेवण झाले. दोघांची बिअरची पार्टी झाली. बिट्टू आणि कैलास तौर हे खाली जमिनीवर झोपले होते. तर बिट्टूची पत्नी आणि छोटी मुलगी पलंगावर झोपली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.