आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववैमन्यासातून युवकाची हत्या; चौघांनी कोयता, लाठ्या-काठ्यांनी केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पूर्ववैमण्यसातून मारहाण करून तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. चौघांनी कोयता, सिमेंट चे गट्टू, लोखंडी रॉडने तरूणाला मारहाण करून त्याचा खून केला. गळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली. आकाश लांडगे (वय-२४ रा.चिंचवडगाव) असे मयत तरुणाचे नाव असून रणजित चव्हाण, बाबा मोरे, प्रफुल्ल ढोकने, सोन्या वराडे, असे हल्लेखोरांचे नावे आहेत. घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले असून चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

 

अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री 11 वाजेदरम्यान आकाश आपल्या मामाच्या नोकरासह पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक आरोपी रणजित चव्हाण, बाबा मोरे हे आणखी दोन सहकाऱ्यांना घेऊन आले आणि आकाशशी वाद सुरू केला. रणजित चव्हाण, बाबा मोरे, सोन्या वराडे, प्रफुल्ल ढाकणे यांनी आकाशला सिमेंटचे गट्टू, कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये आकश गंभीर जखमी झाला. हल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर आकाशला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिंचवड पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत आकाश याच्यावर गुन्हे दाखल होते. तसेच आरोपी रणजित चव्हाण याचे देखील गंभीर क्रिमिनल रेकॉर्ड असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...