आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातात नौदलातील 26 वर्षीय अधिकाऱ्याचा मृत्यू, ट्रकला धडकली कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात सोमवारी नौदलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्रीकांत नागीपोगू (26) असे या नौदल अधिकाऱ्यांचे नाव असून ते मूळचे आंध्रप्रदेशचे आहेत. त्यांची कार एका ट्रकवर आदळून हा अपघात झाला होता. 
 
श्रीकांत यांची नियुक्ती लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या जहाजावर झाली होती. त्याठिकाणी रुजू होण्यासाठी जात असतानाच अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. एक्सप्रेस वेवरील भतान बोगद्याजवळील कोन गावात रविवारी सकाळी हा अपघात घडला. 95 किमि अंतराच्या या एक्सप्रेस वेवर कोणतीही गाडी उभी करण्यास किंवा थांबवण्यास मनाई आहे. पण ट्रक ड्रायव्हर दिवाकर पटेल याने इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रस्त्याच्या बाजुला ट्रक उभा केला होता. पण त्याने त्यासाठी इशारा देणारे काहीही सिग्नल दिलेले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. 
 
अपघातात श्रीकांत यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ट्रक ड्रायव्हरला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...