आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या मंचावरूनच भूमिका मांडेन : छगन भुजबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्र सदन गैरव्यहार प्रकरणात अटकेत राहिल्यानंतर जामिनावर मुक्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुण्यातील फुले वाड्यात महात्मा ज्याेतिबा फुले अाणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर जाणार की नाही याबाबत सध्या वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, रविवारी राष्ट्रवादीच्या पुण्यात हाेणाऱ्या २०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी सहभागी होईन.

 

याच व्यासपीठावरून मी माझी पुढील भूमिका मांडेन, असे भुजबळ यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले. महात्मा फुले वाडा हे माझे ऊर्जा केंद्र असून मी पुढील कामासाठी ऊर्जा घेण्याकरिता येथे अालाे अाहे, असे भुजबळ म्हणाले.

 

अाभार व्यक्त
जामिनावर सुटल्यानंतर शरद पवार, अजित पवार, नारायण राणे, पंकजा मुंडेे, जयंत पाटील, गिरीश महाजन असे सर्व पक्षांतील नेते त्यांना भेटण्याकरिता अाले हाेते. या सर्वांचे भुजबळ यांनी आभार मानले. महात्मा फुले वाडा भेटीच्या निमित्ताने भुजबळ समर्थकांनी फटाक्यांची अाताषबाजी करत त्यांचे स्वागत केले.

 

 

बातम्या आणखी आहेत...