आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेछूट विधाने करणारे नेमाडे म्हणजे कादंबरी विश्वातले ‘बाळासाहेब ठाकरे’ : हर्डीकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुरस्कारांविरोधात  नेहमी बोलणारे भालचंद्र नेमाडे आता सर्व पुरस्कारांचा स्वीकार करत आहेत. पुरस्कारांचा तिरस्कार करणारे नेमाडे आता पुरस्कार स्वीकारण्यात आघाडीवर आहेत. कुसुमाग्रजांबद्दल कादंबरीत हीन उल्लेख  करणारे नेमाडे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार आवर्जून स्वीकारताना दिसतात. बेछूट विधाने करणारे नेमाडे म्हणजे मराठी कादंबरी विश्वातले  ’बाळासाहेब ठाकरेच’ आहेत, अशी टिप्पणी ज्येष्ठ अभ्यासक विनय हर्डीकर यांनी रविवारी केली.    


‘भालचंद्र नेमाडे - अवघा डोंगरू पोकळ असे’ असा विषय व्याख्यानासाठी  निवडून हर्डीकर यांनी  व्याख्यान  आधीच  गाजते ठेवले होते. आशय सांस्कृतिकतर्फे  गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात हे व्याख्यान  दोन भागांत हर्डीकर यांनी मांडले. ‘मराठी वाङ््मयात देशीवादाचा  पुरस्कार नेमाडेंनी केला, पण देशीवाद  हे वाङ्यीन मूल्य ठरू शकत नाही.’‘हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीवर  नेमाडे ३५ वर्षे काम करत होते, तेवढाच काळ मी नेमाडे नावाचे कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. ‘बिढार’च्या दुसऱ्या भागाला ‘हूल’ शीर्षक देणे, ही नेमाडे यांनी वाचकांना दिलेली ‘हूलच’ आहे आणि  असे पुन्हा पुन्हा लिहिले म्हणजे चांगले निर्माण होते, ही नेमाडपंथीयांची गैरसमजूत आहे, असेही हर्डीकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...