आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षार्थी मुलींच्या तपासणीची चाैकशी: शिक्षणमंत्री; बदनामी करण्याचा डाव-‘एमअायटी’चा अाराेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एमअायटीच्या लाेणीकाळभाेर येथील परीक्षा केंद्रावर बारावी परीक्षेदरम्यान काॅपीचा प्रकार टाळण्यासाठी कपडे उतरवून तपासणी करण्यात अाल्याचा अाराेप काही मुलींनी केला अाहे. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्यात येईल, अशी घाेषणा शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांनी केली. तर दुसरीकडे, परीक्षा केंद्रावर काॅपी करू न दिल्यामुळे काही पाल्य व पालकांनी संस्थेच्या प्राचार्य व इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली असून एमअायटी संस्थेला बदनामी करण्यासाठी असे अाराेप केले जात अाहेत असा अाराेप  माइर्स एमअायटीचे सचिव प्रा.डाॅ.मंगेश कराड व कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

 

तसेच या वेळी विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या कॉप्यांचा ढीगही दाखवण्यात आला.
अाराेपाचे खंडन करताना स्वाती कराड म्हणाल्या, येथे पूर्वी पृथ्वीराज कपूर शाळेत बाेर्डाचे परीक्षा केंद्र हाेते.  मात्र, त्याठिकाणी काॅपीचे माेठे प्रकार होत असल्याने यंदा एमअायटीत नवीन परीक्षा केंद्र सुरू करण्यात अाले. या परीक्षा केंद्रावर उच्च माध्यमिक केंद्राच्या नियमांचे काटेकाेर पालन करून परीक्षा घेतली जाते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...