आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगराव राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे महाराष्ट्राचे दु:ख, मान्यवरांकडून अादरांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांनी पुणे, सांगली परिसरात शैक्षणिकदृष्ट्या माेठे काम केले असून त्यांचे काम महाराष्ट्र कदापि विसरू शकणार नाही. राजकारणातही झपाट्याने कामे करण्याची त्यांची पद्धत हाेती व राजकीय कारकीर्दीत त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची मंत्रिपदे सांभाळताना अापल्या कामाचा ठसा उमटवला. मुख्यमंत्रिपदाची त्यांची याेग्यता हाेती व त्या दृष्टीने त्यांचा कामाचा अनुभव हाेता. मात्र, अखेरपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री हाेऊ शकले नाहीत, याचे माेठे दु:ख महाराष्ट्राला असल्याचे मत काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांनी कदम यांना पुण्यातील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.
 
कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला-
 

पतंगराव कदम जाणे ही फार दु:खाची गाेष्ट असून नेहमी त्यांची खेळकर वृत्ती अाणि हसत-खेळत ते काम करत हाेते. सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून काेणत्याही प्रकारचा तणाव कधी न दाखवता सर्वांशी एकरूप ते हाेत असत. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गाेरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला तसेच शैक्षणिक क्षेत्रात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून स्वत:च्या कार्यशैलीचा ठसा उमटवला. सामाजिक कामातही त्यांचे फार माेठे याेगदान हाेते. ते गेल्यामुळे समाजाची फार माेठी हानी झाली अाहे, असे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले.

 

पतंगरावांनी सडेतोड भूमिका मांडली-

 

एखादी याेजना भान ठेवून अाखणे अाणि बेभान हाेऊन त्याची अंमलबजावणी करणे हे पतंगराव कदम यांचे सूत्र हाेते. पुण्यातील एका बाेळात सुरू झालेली शैक्षणिक संस्था बाेळातच संपेल, अशा प्रकारची कुचेष्टा त्यांनी सहन केली. मात्र, जिद्द-चिकाटी-अखंड परिश्रमाच्या जाेरावर त्यांनी याेग्य माणसांची निवड करत शैक्षणिक कार्यात नावलौकिक मिळवला. त्यामुळेच माझ्याजवळ दहा हजार मेंदू अाणि वीस हजार हात कामाकरिता अाहेत, असे ते म्हणत. प्रचंड वेगाने काम करणे, सडेताेड भूमिका मांडणे, कामाची माेकळीक लाेकांना देणे हे त्यांचे जीवनाचे सूत्र हाेते, या शब्दांत महाराष्ट्र साहित्य परिषद कार्याध्यक्ष मिलिंद जाेशी यांनी श्रद्धांजली वाहिली.

बातम्या आणखी आहेत...