आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाण पुलावरून एम्पायर इस्टेट येथील नागरिक नाराज; रॅम्प रद्द करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

पुणे- पिंपरी-चिंचवड मधील सर्वात लांब पल्ला असलेला उड्डाण पुलावरून सध्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उड्डाण पुलाचे काम हे अंतिम टप्प्यात असून हा उड्डाण पूल एम्पायर इस्टेट वरून गेला आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी वसाहतीतील शेकडो नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. या उड्डाणपुलाची किंमत तब्बल 98 कोटी रुपये आहे.

 

 

उच्चभ्रू असलेल्या एम्पायर इस्टेट येथील वसाहतीवरून गेलेल्या उड्डाण पुलाचे काम 2011 ला महापालिकेने सुरू केले. सद्यस्थितीला पुलाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. मात्र आता उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने रॅम्प निघणार आहे. यामुळे वसाहती समोर वाहतूक कोंडी होणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. आज महापालिकेवर एम्पायर इस्टेट येथील रहिवाशांनी मोर्चा काढला. या वसाहतीत 10 हजार नागरिक याठिकाणी वास्तव्यास आहेत. तर येथील रहिवासी दीड कोटी रुपये कररुपात महापालिकेला नियमित भरतात. जर दोन्ही बाजूंनी रॅम्प झाले तर बेमुदत उपोषणाचा इशारा महापालिकेला रहिवाशांनी दिला आहे. यावेळी रॅम्प रद्द करण्यासाठी घोषणा दिल्या. हातात फलक घेऊन आबालवृध्द रस्त्यावर उतरले होते. या वसाहतीत सदनिका घ्यायची म्हटल्यास तब्बल कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. या उड्डाण पुलाची लांबी पावणेदोन किलोमीटर आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...