आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ तबलावादक पं. अरविंद मुळगावकर यांचे मुंबईत निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ज्येष्ठ तबलावादक आणि संगीतज्ञ तसेच ज्येष्ठ गुरू पं. अरविंद मुळगावकर (८१) यांचे मंगळवारी रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी मृणाल, कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पं. मुळगावकर हे उस्ताद आमिर हुसेन खाँ यांचे शिष्य होते. तबलावादनातील फरुखाबाद घराण्याचे ते प्रतिनिधी होते. एकल तबलावादनाप्रमाणेच साथसंगतकार म्हणूनही त्यांची ख्याती होती. गुरू या भूमिकेतून त्यांनी आजवर अनेक शिष्य घडवले. त्यांनी लिहिलेली “तबला’ आणि ‘आठवणींचा डोह’ ही पुस्तके खूप प्रसिद्ध 
झाली आहेत. पं. मुळगावकर यांना नुकताच संगीत नाटक अकादमी सन्मान प्रदान करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...