आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विमानतळावर केसांच्या क्लिप्समध्ये सापडले 18 लाखांचे सोने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल 18 लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. हे सोने डोक्याच्या फॅन्सी क्लिप तसेच हेअर बँड्समधून लपवून आणण्यात आले होते. सीमा शुल्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

 

 

मोहम्मद इरफान शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मुंबईत ट्राँबे येथे राहायला आहे. दुबई ते पुणे या स्पाईस जेट विमानातून इरफान आला होता. पुणे सीमा शुल्क विभागाच्या पोलिसांना इरफानच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

 

 

त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्याच्या सामानात डोक्याच्या क्लिप्स तसेच केसाच्या बँड्समध्ये सोने आढळून आले. या सामानातील वस्तुंमध्ये 566.78 ग्राम सोने मिळून आले असून या सोन्याची भारतीय मूल्यानुसार तब्बल 17 लाख 57 हजार रुपये किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे

बातम्या आणखी आहेत...