आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune Accident: वारजे पुलाजवळ बस उलटून 10 जण जखमी, एक जण बसखाली अडकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - वारजे पुलाजवळ पीएमपीएल बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने कात्रजहून निगडीकडे जाणारी बस रस्त्याच्या कडेला कलंडली आहे. या अपघातात 10 जण जखमी झाले असून, एक प्रवासी बसखाली अडकला आहे. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस पथक हजर असून क्रेनच्या साहाय्याने बस काढण्याचे काम सुरू आहे.

 

ओढ्यालगत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी मजुरांसाठी राहण्याची सोय करण्यात आलेल्या पञ्याच्या शेडवर ही बस कलंडली. बसमधील जखमी प्रवासी तसेच शेडमधील 2 नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...   

बातम्या आणखी आहेत...