आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: भारती विद्यापीठ परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांकडूनच बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- भारती विद्यापीठ परिसरात अांबेगाव बुद्रुक येथील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर तिच्या वडीलांनी वेळाेवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी 43 वर्षीय अाराेपी वडिलास पाेलीसांनी अटक केली असून भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात त्याच्या विराेधात बलात्कार अाणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

 

याबाबत पिडित मुलीच्या शाळेतील 50 वर्षीय शिक्षिकेने अाराेपी विराेधात पाेलीसांकडे फिर्याद दिली अाहे. अाराेपीने 11 वर्षीय पिडित मुलीशी वेळाेवेळी शारिरिक संबंध प्रस्थापित करुन, सदर प्रकराबाबत काेणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मागील काही दिवसांपासून सदर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत दिसून अाल्याने शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे चाैकशी केली असता सदर प्रकार उघडकीस अाला. याबाबत पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पी. वाय. ताटे करीत अाहे.

बातम्या आणखी आहेत...