आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: फत्तेचंद जैन कॉलेजमध्ये घुसून विद्यार्थ्यावर वर्गमित्रांचा कोयत्याने हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कागदाचे बाेळे एकमेकांचे अंगावर फेकण्यावरुन झालेल्या वादात एका विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे अावारातच, वर्गातील दाेन मुलांनी काेयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला अाहे. रुपेश राजेश गायकवाड (वय- 17, रा. चिंचवड, पुणे) असे या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव असून त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. 

 

रुपेश गायकवाड हा चिंचवड येथील फत्तेचंद महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत अाहे. नऊ मार्च राेजी वर्गातील एका विद्यार्थ्याने कागदाचे बाेळे त्याला फेकुन मारले हाेते. त्यावरुन सदर दाेन विद्यार्थ्यां मध्ये वादविवाद झाले हाेते. त्याचा राग मनात धरुन वर्गातील दाेन मुलांनी साेमवारी सकाळी सात वाजता रुपेश महाविद्यालयात अाल्यावर त्याच्यावर पाळत ठेवली.

 

रुपेश वर्गात गेल्यानंतर त्यास तास सुरु असताना, एकाने बाहेर बाेलवून घेत तुला प्राचार्यांनी बाेलवले अाहे असा निराेप दिला. त्यानुसार ताे प्राचार्यांच्या अाॅफीसकडे जात असताना, महाविद्यालयाचे अावारात दबा धरुन बसलेल्या वर्गातील दाेन मुलांनी अचानक त्याचेवर काेयत्याने हल्ला करुन त्यास गंभीर जखमी केले. चिंचवड पाेलीस याप्रकरणी पुढील तपास करीत अाहे.

बातम्या आणखी आहेत...