आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नीची क्रूर हत्या, पतीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रोज होणा-या भांडणाला कंटाळून पुण्यातील हडपसर भागात पतीने पत्नीची क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे डोके आणि चेहरा हातोड्याने ठेचून अतिशय क्रूर पद्धतीने पतीने मंगळवारी रात्री पत्नीची हत्या केली. पोलिसांनी नराधम पतीला अटक केली आहे.

 

रेणूका संजय पवार (वय- 30 म्हसोबा मंदिराजवळ हडपसर, पुणे) असे मृत पत्नीचे नाव आहे तर या प्रकरणी संजय अर्जून पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

याबाबतची माहिती अशी की, या जोडप्याचे 12 वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र, मागील काही वर्षापासून दोघांत पटत नव्हते. त्यामुळे रोजच भांडणे होत होती. पतीच्या त्रासाला वैतागून पत्नी रेणूका माहेरी जायची. मंगळवारीही त्यांच्यात नेहमीप्रमाणे कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रात्री पती संजय पवारने रोजच्या भांडणाला वैतागून रेणूका हिच्या डोक्यात हातोडा घालून तिची हत्या केली. यानंतर तिच्या चेह-यावर हातोड्याने घाव घातले. या घटनेनंतर पोलिसांनी संजय पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...