आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: खडकीत कोट्यावधी रूपयांची पोर्शे कार जाळली, घटना सीसीटीव्हीत कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील खडकी भागात सोमवारी मध्यरात्री तीन अज्ञात जणांनी एका बंगल्यासमोर लावलेल्या दोन गाड्या पेटवून दिल्या. यात कोट्यावधी रूपये किंमतीची अलिशान पोर्शे कारसह एका अल्टो गाडीचा समावेश आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, तीन लोक रॉकेल ओतून पेटवून देताना दिसत आहेत.

 

याप्रकरणी हितेश पारेख (वय-29, खडकी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी आपल्या बंगल्याबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सादर केले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

याबाबतची माहिती अशी की, हितेश पारेख हे खडकीतील सोने-चांदीचे व्यापारी आहेत. ते खडकी परिसरात राहतात. पारेख यांनी सोमवारी रात्री आपल्या बंगल्या बाहेर पोर्शे कार व एक अल्टो कार लावली होती. मात्र, गेटवरून अज्ञात तीन लोक आत शिरले व त्यांनी दोन्ही गाडीवर बाटलीतून रॉकेल किंवा पेट्रोल काहीतरी टाकले व त्यानंतर आग लावली.

 

पारेख यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील अग्निशमन दलाला फोन केला मात्र त्यांची गाडी नादुरूस्त होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. मात्र, या गाड्या येईपर्यंत दोन्ही गाड्या खाक झाल्या होत्या. खडकी पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

 

15 दिवसापूर्वी पुण्यातील धायरी परिसरातील रायकर मळा येथे अशाच पद्धतीने सोसायटीच्या आवारात लावलेल्या चार कार पेटवून दिल्या होत्या. त्यात एका महागड्या व अलिशान अशा ऑडी कारचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...