आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. व्ही. गोखले यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव डॉ. श्रीकांत विष्णू ऊर्फ एस. व्ही. गोखले (वय 87) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ. प्रभा गोखले, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पंडित ऑटोमोटिव्हचे विजय गोखले आणि मित्र फाउंडेशनचे धनंजय गोखले हे त्यांचे पुत्र होत.

 

एस. व्ही. गोखले यांचे शालेय शिक्षण सोलापूर आणि नंतर पुण्यातील नूतन मराठी विद्याालयात झाले. शालेय वयापासूनच त्यांना पोहण्याची आणि व्यायामाची आवड होती. शरीरसौष्ठव आणि वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली होती. बी. जे. वैद्याकीय महाविद्याालयातून एमबीबीएस पदवी संपादन करताना त्यांनी मेडिसिन विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. संगीत आणि नाट्य कलेची आवड असलेल्या गोखले यांनी महाविद्याालयामध्ये आर्ट सर्कलची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. गोखले यांनी पाच वर्षे ‘बी. जे. बॉडी ब्युटिफूल ट्रॉफी’ पटकाविली होती. हृदयरोगतज्ज्ञ या नात्याने वैद्याकीय व्यवसायामध्ये त्यांनी ख्याती संपादन केली होती. 

 

ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्यासमवेत त्यांची मैत्री होती. पं. जोशी यांच्यासमवेत गोखले यांनी 22 वर्षे आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या सचिवपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. भीमसेनजी यांच्यासह पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज, मालिनी राजूरकर आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्याशी त्यांचे कौटुंबीक मैत्रीचे संबंध होते. संगीत श्रवणाचा छंद असलेल्या गोखले यांनी विविध गायक-वादक कलाकारांच्या ध्वनिफिती आणि सीडी संकलित केल्या होत्या. अडीच हजारांहून ध्वनिमुद्रणाचा संग्रह त्यांनी केला होता. 

बातम्या आणखी आहेत...