आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भिमा प्रकरण: मिलिंद एकबाेटे न्यायालयीन काेठडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव भीमा येथे दाेन गटांत घडलेल्या दंगलीस चिथावणी दिल्याच्या अाराेपावरून अटकेत असलेला हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटेला बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी गनिमी कावा संघटनेचा कार्यकर्ता संजय वाघमारेसह तिघांनी एकबोटेच्या अंगावर शाई फेकली होती. एकबाेटेच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली होती.  या पार्श्वभूमीवर बुधवारी न्यायालयात पोलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.