आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चिमुकलीच्या घशात शेंगदाणा अडकल्याने ब्राँकोस्कोपी शस्त्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- एका दोन वर्षांच्या चिमुकलीच्या घशात शेंगदाणा अडकल्याने तिच्यावर ब्राँकोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्वासनलिकेत तब्बल तीन महिने शेंगदाणा अडकलेल्या या बालिकेवर एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन महिन्यांपासून या मुलीचा श्वास गुदमरत असल्याने ऑक्सिजनअभावी तिची प्रकृती गंभीर होती. 

 

 

जाणवत होती ही लक्षणे

तीन महिने घशात घरघर व तीव्र खोकल्याची लक्षणे असलेल्या या बालिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडचणी येत असल्याने ती निळी पडत चालली होती. श्वासनलिकेत बाह्य वस्तू अडकल्याने श्वास घेण्यास अडचण येत असल्याचे निदान करण्यात आले.  ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती होती. छातीतील 8x4 मिलीमीटर आकाराचा शेंगदाणा काढून टाकण्यासाठी लवचिक ब्राँकोस्कोपी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती