आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीयुत महिलेवर उपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कार पोलिसांनी जेरबंद केले आहे. सचिन सदाशिव येरवडेकर (४८, कसबा पेठ) असे  मांत्रिकाचे नाव असून त्याला  १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी गुरुवारी दिला आहे.


या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. सतीश चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संध्या गणेश सोनवणे नामक महिलेला डॉ. चव्हाणच्या नर्सिंगमध्ये दाखल केले होते. त्याने तिच्यावर छातीतील दुधाच्या गाठीची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, त्यानंतरही तिची तब्येत बिघडल्याने तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी शस्त्रक्रिया होणे आवश्यक असतानाही डॉ. चव्हाणने मांत्रिकास बोलावून तिचा उतारा  काढला होता. त्यामुळे उपचारात दिरंगाई झाल्याने संध्याचा मृत्यू झाला.