आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर यांची निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविकांत तुपकर.... - Divya Marathi
रविकांत तुपकर....

पुणे- खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची गुरूवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत खासदार राजू शेट्टी यांनी तुपकर यांच्या नावाची घोषणा केली. तुपकर हे विदर्भातील अकोला-बुलढाणा पट्ट्यातील आहेत.

 

शेतकरी संघटनेची बुलंद तोफ म्हणून तुपकर यांनी आपली ओळख बनविली आहे. शेतक-यांच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेट्टी यांच्यानंतर संघटनेला तुपकर यांच्या रूपाने तरूण व तडफदार नेता मिळाला आहे. कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार शेट्टी व स्वाभिमानीशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच रयत शेतकरी संघटना स्थापन करून स्वतंत्र चूल मांडली आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात दरी पडल्यानंतर संघटेनेचे प्रदेशाध्यक्ष कोणाकडे जाणार याची चर्चा होती.

 

राजू शेट्टी यांनी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर खोत व तुपकर यांना सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले होते. मात्र, खोत यांनी नकार देत भाजपशी जवळिक वाढविली. तर शेट्टींच्या आदेशानुसार, तुपकर यांनी वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देत आपली निष्ठा दाखवून दिली होती. त्यामुळे शेट्टी हे तुपकर यांच्याकडे संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सोपवतील असे आखाडे बांधले जात होते. त्यानुसार आज पार पडलेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत शेट्टी यांनी तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...