आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कास्टिंग काऊचवर सरोज यांच्यानंतर रेणुका चौधरी म्हणाल्या- प्रत्येक ठिकाणी याचा सामना करावा लागतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगलीतील एका कार्यक्रमात सरोज खान यांनी कास्टिंग काऊचवर वक्तव्य केले होते. - Divya Marathi
सांगलीतील एका कार्यक्रमात सरोज खान यांनी कास्टिंग काऊचवर वक्तव्य केले होते.

पुणे - कोरिओग्राफर सरोज खान यांनी बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याचे म्हटले होते. सांगलीत एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी बॉलिवूडमध्ये असले प्रकार होत असल्याचे म्हटले होते. त्या म्हणाल्या की, यात काही नाविन्य नाही. हे तर बाबा आदमच्या काळापासून सुरु आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये दुष्कर्मानंतर मुलींना वाऱ्यावर सोडले जात नाही. त्यांना काम दिले जाते. त्यांच्या रोजी-रोटीची सोय त्यामुळे लागते. सरोज खान यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या, 'असे कृत्य प्रत्येक ठिकाणी होते, हे कटूसत्य आहे. संसद असेल किंवा इतर कामाची ठिकाणेही यापासून सुटलेली नाहीत. आता वेळ आली आहे की संपू्र्ण देशाने एक होऊन त्याविरोधात आवाज उठवण्याची. 'मी टू' म्हणण्याची.' 

 

सरोज खान यांनी मागितली माफी

- सरोज खान यांच्या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीक होऊ लागल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. मला खेद आहे, मी माफी मागते, असे त्या म्हणाल्या आहेत.

 

रणवीर म्हणाला- असे होत असले तर दुःखद आहे... 
- कास्टिंग काऊचवर रणवीर सिंह म्हणाले, 'मला कधी याचा अनुभव आला नाही. मात्र असे जर होत असेल तर ते दुःखद आहे.'

 

काय म्हणाल्या सरोज खान 
- सोमवारी सांगलीमध्ये फ्यूजन डान्स अकॅडमीकडून एक दिवसीय डान्स प्रशिक्षणशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या उपस्थित होत्या. सरोज म्हणाल्या की, कास्टिंग काउच इंडस्ट्रीसाठी काही नवीन गोष्ट नाही. हे तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरु आहे. इंडस्ट्रीमध्ये दुष्कर्म केल्यानंतर मुलींना सोडून दिले जात नाही. त्यांना काम आणि रोजी-रोटी मिळते.
- सरोज खान येथेच थांबल्या नाहीत. त्यांनी सरकारी कर्मचा-यांवरही निशाना साधलाय. अनेक सरकारी लोक मुलींवर हात साफ करुन घेतात. असे त्या म्हणाल्या.
- सरोज खानला एका न्यूज चॅनलच्या शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. फिल्म इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा सरोज खान यांनी असे वक्तव्य केले.


सोशल मीडियमध्ये साधला जातोय निशाना
- सरोज खान व्दारे कास्टिंग काउचवर केलेल्या व्यक्तव्यावर लोक सोशल मीडियावर नाजारी व्यक्त करत आहेत.
- एका यूजरने लिहिले, "अशिक्षित महिलेकडून कसे उत्तर असेल?"
- तर एका यूजरने लिहिले की, 'जिथून आपण शिकतो, पाहा तिथले लोक काय विचार करतात.'
- तर एका यूजरने लिहिले की, 'काही लोक रोज नवे तर्क लावतात, रेप का योग्य आहे?'
- तर सरोज खानच्या एका फॅनने लिहिले की, 'मी तुमचा फॅन आहे, माझ्या मनात तुमच्यासाठी खुप सन्मान आहे. परंतू हे व्यक्तव्य लाजिरवाने आहे.

बातम्या आणखी आहेत...