आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर सध्या एक आठवड्याच्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. रविशंकर यांच्या उपस्थितीत गुरूवारी पुण्यातील भारती विद्यापीठात भव्य सत्संग कार्यक्रम पार पडला. दररोज ध्यान करण्याचे फायदे सांगून त्यांनी उपस्थित जनसमुदायाकडून ध्यान करवून घेतले. पुढील दोन दिवस रविशंकर यांचे मुंबईत विज्ञान भैरव, सत्संग आणि महालक्ष्मी होम इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
पुण्याचे विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी रविशंकर यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे विशेष कामगिरी बजावलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 25 प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. भारती विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या ठिकाणी श्री श्री यांचा कार्यक्रम व्हावा असे दिवंगत पतंगराव कदम यांचे स्वप्न होते व ते आज पूर्ण झाले आहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे जनसमुदायाने त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
श्री श्री रविशंकर सध्या महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत. सातारा व नगर येथील येथील सत्संग, युवाचर्य संमेलन, योग आणि उद्योग आणि कौशल विकास कार्यक्रम, ज्ञान मंदिर लोकार्पण इत्यादी कार्यक्रम पार पाडल्यानंतर श्री श्रींच्या सान्निध्यात भारती विद्यापीठ मैदानात हा सत्संग पार पडला.
मंत्रजपाचे महत्व व इतर मुद्यांवर भाष्य करताना रविशंकर म्हणाले, ध्यान, जप व मंत्रजाप करण्याने मेंदूच्या मागच्या बाजूला असलेली ‘वेगस’ नावाच्या मज्जा तंतूची कार्यक्षमता वाढते. त्याचप्रमाणे संस्कृत भाषा शिकल्यानेही या तंतूची क्षमता वाढते हे सिध्द झाले आहे. पंढरपूरला जाणारे वारकरी भजन, कीर्तन करत करत चालतात त्यामुळे थकत नाहीत. आजचे युवक, शिक्षणापासून ते नदी पुनरुज्जीवन, सेंद्रिय शेती आणि यासारखी अनेक चांगली कामे करीत आहेत. महाराष्ट्रात 38 नद्यांचे पुनरुज्जीवनाचे कार्य चालू आहे. आज ज्योतिबा फुले, आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता. इथे जाती, धर्म असा कोणत्याच प्रकारचा भेद नाही. सर्वजन एकत्र येऊन समाजोपयोगी कार्य करीत आहेत, अशा शब्दांत त्यांनी कौतूक केले.
श्री श्रींनी साधकांच्या प्रश्नांना हलक्या फुलक्या शैलीत उत्तरे दिली. मोठ्यांचा आदर करा. ध्यान, प्राणायाम, सुदर्शन क्रिया करून आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, रविशंकर यांच्या कार्यक्रमाचे फोटोज......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.