आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेलिंग येत नसल्याने पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेची बेदम मारहाण; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- स्पेलिंग चुकल्याने शिक्षिकेने सहा वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे समोर आले आहे. सुमित चव्हाण असे विद्यार्थ्याचे नाव आहे. भोसरी येथील स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 मार्च रोजी हा प्रकार घडला. 

 

 

टिशा पिल्ले नामक शिक्षिकेने सुमितची क्लास वर्क बुक तपासली असता, त्यात स्पेलिंग चुकल्याचे दिसून आले. तेव्हा शिक्षिकेने लाकडी डस्टरने डोक्यात मारले, तसेच पट्टीने पाठीवर मारले. ही शिक्षिका एवढ्यावरच थांबली नाही, तर सुमितचे डोके बेंचवरही आपटले.सुमितच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसत असून, याप्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सुमितच्या डोक्यात टेंगुळ आले होते. तर पाठीवर आणि हातावर व्रण उमटले आहेत. हा सर्व प्रकार सुमितने त्याच्या वडिलांना वर्गाबाहेर आल्यानंतर सांगितला. याप्रकरणी शिक्षिका टिशा पिल्ले यांच्याविरोधात सुमितचे वडील रवींद्र चव्हाण यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. अद्याप शिक्षिकेला अटक करण्यात आलेली नाही.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 
बातम्या आणखी आहेत...