आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदींनाच पाठिंबा- आठवले, धनगर अारक्षणालाही पाठिंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काेरेगाव भीमा प्रकरणात भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश अांबेडकर यांचे नेतृत्व नावारूपास अाले. त्यामुळे रिपब्लिकन एेक्याच्या दिशेने यापुढील काळात त्यांनी वाटचाल करावी. त्यांच्या अध्यक्षतेखाली एकत्र येण्यास व नेतृत्व स्वीकारण्यास अाम्ही तयार अाहाेत. मात्र, अागामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनाच अापला पाठिंबा राहणार आहे. मोदी दलितविराेधी, संविधानविराेधी असल्याचा प्रचार काँग्रेस करत अाहे. मात्र, काँग्रेसने कितीही अकांडतांडव केले तरी राहुल गांधी लवकर पंतप्रधान हाेणार नाहीत. लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसला शंभरचा अाकडा पार करता येणार नाही, असे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. एकाच वेळी अाठवले यांनी पंतप्रधान माेदी यांच्यासाेबतच राहण्याचे सूतावेच करतानाच प्रकाश अांबेडकरांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे.   


पुण्यात राष्ट्रीय अधिवेशन : रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया (अारपीअाय)च्या वतीने पुण्यातील एसएसपीएमएस मैदान याठिकाणी २७ मे राेजी राष्ट्रीय अधिवेशनाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना निमंत्रण दिल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिवेशनास उपस्थित राहण्याचे निश्चित झाले अाहे. दलित चळवळ माेर्चाबांधणी, त्याबाबतचा अाराखडा निर्मिती, दलित अत्याचार, अार्थिक प्रश्न, सर्वांगीण विकास या गाेष्टींवर गुरुवारी रिपाइं  राज्य कार्यकारिणीत ठराव संमत झाले अाहेत. राष्ट्रीय अधिवेशनात राज्यातील दलित लेखक, विचारवंत अशा सुमारे १५० जणांना आमंत्रण देण्यात आले आहे.

 

धनगर अारक्षणाला पाठिंबा
या वेळी अाठवले म्हणाले, धनगर समाजाला केंद्रात अाेबीसी प्रमाणे सवलती मिळतात. मात्र, राज्यात त्या मिळत नाही. त्यांना एसटी प्रवर्गात टाकणे अडचणीचे ठरत असेल तर त्यांच्यासाठी एक विशेष प्रर्वग करून अादिवासींप्रमाणे सवलती दिल्या पाहिजेत. धनगर समाजाच्या अारक्षणाला माझा व पक्षाचा पाठींबा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, आठवले यांच्या भूमिकेवर डाॅ. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे रिपाइं आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...