आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते पत्र माओवादी समर्थकांनीच व्हायरल केले असावे : पोलिस महासंचालक सतीश माथूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माओवादी समर्थकांविरोधात  पोलिसांकडे ठोस पुरावे असून ते न्यायालयात सादर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल पत्र पोलिसांकडून कोणालाही देण्यात आले नाही. ते माओवाद्यांच्या समर्थकांकडूनच लिक झाले असावे, असे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले.  माओवाद्यांशी संबंधांवरून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

 

त्यांच्याकडून जप्त कागदपत्रांवरून राजीव गांधींच्या हत्येप्रमाणे देशातील मोठ्या राजकीय व्यक्तीला मारण्याचा कट आखल्याचे स्पष्ट होते.   त्याबाबतची तपासातील पत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.  यावरून विरोधकांनी ही कारवाई संशयास्पद व राजकीय हेतूने केली जात असल्याची टीका  केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...