आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- पुणे दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी आणखी दोन संशयित बांगलादेशी नागरिकांना ठाणे आणि महाड येथून ताब्यात घेतले आहे. एटीएसने यापूर्वीच तीन बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयितांनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत बनावट कागदपत्रांच्या आधार कार्ड बनवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक अधिनियम तसेच बनावट पासपोर्टद्वारे देशात प्रवेश केल्याचा आरोप आहे. सोमवारी ताब्यात घेतलेल्यांपैकी १ जण ३० वर्षांचा आहे, तर दुसरा २४ वर्षांचा आहे. एकाला ठाण्यातील अंबरनाथ येथून, तर दुसऱ्याला रायगड जिल्ह्यातील महाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ‘अनसरउल्लाह बांगला’ या संघटनेशी ते संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. एटीएसने शनिवारी मोहंमद हबीब उर रेहमान हबीब उर्फ राज जेसुब मंडल (वय ३१, जिल्हा खुलना, बांगलादेश, सध्या राहणार वानवडी, पुणे), मोहंमद रिपन होस्सेन (वय २५, मूळ राहणार जिल्हा खुलना, बांग्लादेश, सध्या राहणार आकुर्डी) आणि हन्नान अन्वर हुसेन खान (वय २५, मूळ राहणार जिल्हा शरियतपूर, बांगलादेश, सध्या राहणार आकुर्डी) या तीन जणांना अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे तिघे पुण्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून होते. पॅन कार्ड, आधार कार्डसारखी कागदपत्रे त्यांच्याकडे अवैधरीत्या मिळवल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी अजून दोन बांगलादेशींना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी ते संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.