आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pune Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 वारकरी महिला ठार, पालखी सोहळ्यासाठी देहूकडे जात होत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने देहूकडे निघालेल्या 2 वारकरी महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला असून आज (बुधवारी) पहाटे मोशी येथे घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जनाबाई अनंता साबळे (वय 55) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60, दोघी रा. जलालपूर, परळी-वैद्यनाथ, जि. बीड) अशी वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. त्या अंबाजोगाईच्या दिंडीतील सदस्या होत्या.

 

पालखी सोहळ्यासाठी देहूकडे जात होती दिंडी
संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने दोन दिवसांत प्रस्थान होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून देहूकडे दिंड्या येत आहेत. दरम्यान, अंबाजोगाईतून एक दिंडी देहूच्या दिशेने येत होती. त्यात जनाबाई व सुमनबाई होत्या. मोशीच्या बो-हाडेवस्तीत ही दिंडी मंगळवारी (दि. 3) रात्री मुक्कामाला होती. आज पहाटे जनाबाई व सुमनबाई प्रातर्विधीसाठी जात होत्या. त्या वेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी तत्काळ पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलिस पुढील तपास करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...